कुंभार गल्लीत येता भक्त | निश्चित होईल जीवनमुक्त | श्रीकृष्ण सरस्वती येथे असत | साक्षात चैतन्य रूपाने || १ || भक्त ताराईचे ऋण | स्वामी आहेत जाणून | या विषयी अनुमान | उगाच करीत बसू नये || २ || देव भक्तिच्या ऋणात | ऐसी संत कथिती मात | विकल्पवादी जगात | भक्ती कैसी होईल || ३ || उगाच संघर्ष करू नये | श्रीकृष्ण स्वामीसी सोडू नये | संशयाने उडवू नये | भक्तीभाव लोकांचा || ४ || दत्तनाम घेत जावे | श्रीकृष्णासी हृदयी धरावे | प्रेमभावे सादर व्हावे | श्रीकृष्ण सेवा करण्यासाठी || ५ || श्रीकृष्ण भक्तांच्या पाठिशी | प्रेमे राहतो भाक्तांपाशी | या स्थानाची महती ऐसी | जाणोनी अनुभवा भक्तजन हो || ६ || उत्साहे उत्सव करा | श्रीकृष्णासी हृदयी धरा | दिगंबराचे नाम स्मरा | स्वास चालू असे पर्यंत || ७ || साष्टांग घालावे दंडवत | श्रीकृष्णासी स्मरत स्मरत | मग देहभाव असे मरत | श्रीगुरू कृपेने || ८ || ताराईने बांधला अंजनेय | झाली होती श्रीकृष्णमय | म्हणोनी सद्गुरू प्रेममय | होऊनी राहिले या स्थानी || ९ || कल्पांत पर्यंत येथे वास | राहिन मी या स्तनास | ऐसी ग्वाही अनेक भक्तांस | श्री स्वामीनी दिधली असे || १० || उदंड सेवा करावी | ऐसी वृत्ती व्हावी | खरे जे सेवाभावी | श्रीगुरूसी मागती ऐसा वर || ११ || आयुष्यातील प्रेत्येक क्षण | वेचावा श्रीकृष्णाच्या आठवणीतून | विकल्पाने कधीही मन | दूषित होऊ देऊ नये || १२ || उदंड सेवा करता करता | आयुष्यकाल होईल सरता | अक्षयामृताचा ठेवा पुरता | श्रीकृष्ण सेवा करता मिळेल || १३ || प्रेमभावे भक्ती करा | प्रेमानंद मिळवा पुरा | मग प्रपंच परमार्थाची धुरा | श्रीगुरु तुमच्या वाहील हो || १४ || आता हेच सांगणे | नको काही कटकट भांडणे | सेवा करताना उणेदुणे | उगाच काढत बसू नये || १५ || करता दत्ताचा जयजयकार | पळतील दूर सारे विकार | विवेकाने भरेल अंतर | श्रीकृष्णरूप होण्यासाठी || १६ || श्रीकृष्ण स्वामीनी कथिले मजला | गुरुनाथ केवळ निमित्त झाला | अक्षरामृताचा हा प्रसाद दिधला | भक्तोद्धारक स्वामीनी || १७ || श्री चरणरज – गुरुनाथ वि. मुंगळे, कोल्हापूर.