महाराजांचे रूपवर्णन

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे ताराबाई शिर्के यांच्या घरी सन १८४६ च्या दरम्यान आले. ताराबाई यांची भक्ती, एकनिष्ठा, समर्पण भाव पाहून ते तिथेच राहिले.महाराजांचे हिंडणे, फिरणे अगदी लहान मुलासारखे होते.महाराजांचा पेहराव म्हणजे त्यांच्या अंगावर मलमली (अगदी पातळ) कुर्ता असे. कुर्ता हा फिकट निळा, पांढरा, पिवळा, केशरी अशा वेगवेगळ्या रंगामध्ये असे. खाली लंगोटा घालत तर कधी महाराज पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. महाराजांच्या कपाळावर केशरी रंगाचा टिळा असे. तो जर नसेल तर पंढरपुरी बुक्याचा टिळा नेहमी असे. कधी कधी महाराजांचे कपाळ पूर्ण केशरी चंदन किंवा भस्माने भरलेले असायचे. महाराज रंगाने सावळे होते व त्यांच्या डोक्यावरचे केस हे नेहमी कमी असायचे, पण त्यांच्या गोल चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांचे बोलके डोळे व त्यांचे स्मित हास्य मनाला भारावून टाकणारे होते.

शिर्के घराणे

माईसाहेब शिर्के

बाळासाहेब शिर्के


दैनदिन कार्यक्रम

  • पहाटे ६.०० वा. - पंचामृत अभिषेक

    पहाटे ५.३० च्या सुमारास श्रींना जागे करून सकाळी ६.०० वा. श्रींचे पादुकांवर पंचामृत अभिषेक व पूजा होऊन सूर्योदयाच्यावेळी काकड आरती सुरु होते. काकड आरती नंतर परंपरेनुसार श्रींना दहीभात व खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो.

  • दुपारी १२.१५ वा. - महानैवेद्य व विडा

    दुपारी १२.१५ वा. महानैवेद्य व विडा समाधीस दाखवून १२.३० वा. दोन प्रहरची आरती सुरु होते. आरती नंतर श्रींना शेजघरात शेज घालून झोपविले जाते व दुपारी १.०० ते ४.१५ पर्यंत समाधीचे दर्शन बंद राहते.

  • दुपारी २.०० वा.- पूजा

    दुपारी २.०० च्या सुमारास श्रींच्या समाधीची सुवासिक फुलांनी पूजा बांधली जाते. तसेच ४.१५ वा. श्रींना उठविले जाते.

  • सायंकाळची आरती

    सूर्यास्त होण्यापूर्वी १५ ते २० मि. श्री ज्योतिर्लिंग अष्टक सुरु होते व सूर्यास्त समयी सायंकाळची आरती सुरु होते.

  • रात्रौ ८.०० वा.- भजन

    रात्रौ ८.०० वा. भजन सुरु होते व ८.३० वा. धूप होऊन धूप आरती सुरु होते.

  • शेज आरती

    धूप आरती नंतर रात्रौ ९.०० वा. नैवेद्य व विडा दाखवून शेज आरती (विडा/अष्टक) सुरु होते.

  • रात्रौ ९.३० वा.

    शेजारती संपल्यानंतर रात्रौ ९.३० वा. समाधीवरील पूजा उतरविली जाते व रात्रौ १०.०० वा. श्रींना शेजघरात झोपविले जाते.


प्रकाशित व्हिडीओज (Youtube Playlists)


प्रकाशित ग्रंथ

श्रीकृष्ण सरस्वती चरित्र

तीस अध्यायांचे ओवीबद्ध मराठी चरित्र (पारायणाची पोथी)

यामध्ये महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांनी समाधी घेईपर्यंत केलेल्या लिलांचे सोप्या भाषेत अत्यंत मधुर असे वर्णन करण्यात आले आहे.

किंमत : २०० रु.

चरित्रकार : गुरुसेवक कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के

संपादक व प्रकाशक : गुरुसेवक श्री रामनाथ बबनराव शिर्के आणि गुरुसेवक डॉ. कृष्णनाथ बबनराव शिर्के

प्रकाशन : श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी – मठी (वैराग्य – मठी), कोल्हापूर.

प्रथम आवृत्ती : सन १९७३

सुधारित पाचवी आवृत्ती : गुरूद्वादशी, रविवार दि.०४/११/२०१८

खरेदीसाठी संपर्क

श्रीकृष्णविजय (पूर्वार्ध) व श्रीकृष्णसरस्वतीविजय
(उत्तर चरित्र )

प्रत्येकी तीस अध्यायांचे ओवीबद्ध प्राकृत मराठी चरित्र (पारायणाची पोथी)

पूर्वार्धामध्ये महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांनी समाधी घेईपर्यंत केलेल्या लिलांचे विस्तृत व अत्यंत मधुर असे वर्णन करण्यात आले आहे.

उत्तर चरित्रामध्ये महाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्ताना आलेले अनुभव व व्यास मठीची (निजबोध मठी) गंगावेस कोल्हापूर येथे झालेली स्थापना याचे वर्णन करण्यात आले आहे.

चरित्रकार : कै. गणेश नारायण मुजुमदार

प्रकाशक : विजय व प्रसाद अनंत मुजुमदार

खरेदीसाठी संपर्क

श्रीकृष्ण सरस्वती स्वामीज जीवन चरित्र

तीस अध्यायांचे इंग्रजी चरित्र (पारायणाची पोथी)

गुरुसेवक कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित “श्रीकृष्ण सरस्वती" या मराठी चरित्राचा इंग्रजी अनुवाद

किंमत : ५०० रु.

लेखिका : गुरुसेविका डॉ. राई किरण सुभेदार

प्रकाशक : गुरुसेवक श्री इंद्रजीत शिवाजीराव शिर्के

प्रकाशन : श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी – मठी (वैराग्य – मठी), कोल्हापूर.

प्रथम आवृत्ती : औदुंबर पंचमी, गुरूवार दि.१३/०२/२०२०

सुधारित पाचवी आवृत्ती : गुरूद्वादशी, रविवार दि.०४/११/२०१८

खरेदीसाठी संपर्क

समुद्र भरला आहे

गुरुसेवक कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित “श्रीकृष्ण सरस्वती चरित्र" यावर आधारित हे पुस्तक आहे.

यामध्ये श्रीकृष्ण सरस्वती चरित्राप्रमाणेच तीस अध्याय असुन महाराजांनी केलेल्या लिलांचे सुंदर वर्णन केले आहे.

तसेच महाराजांच्या भक्तांची संपूर्ण माहिती यात दिलेली आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे यात श्री दत्त(अवधूत), श्री नाथ, श्री वारकरी, श्री समर्थ रामदास, श्री आनंद व श्री चैतन्य संप्रदायांचा विस्तार केला आहे.

महाराजांच्या जोशी कुलाची वंशावळ आणि महाराजांच्या अनेक ठिकाणी स्थापित केल्या गेलेल्या मंदिरांची माहितीही आपल्याला या पुस्तकात मिळते.

पुस्तकाचे संपादन, संकलन व प्रकाशन म्हैसाळ चे श्री बजरंग झेंडे महाराज यांनी केले आहे

डाऊनलोड करा

कुंभार गल्लीचे दत्त महाराज

किंमत :१०० रु.

या ग्रंथात महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्राची विविध कथांच्या रूपात मांडणी केली आहे.

चरित्र कथेच्या पहिल्या भागात महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांनी समाधी घेईपर्यंत केलेल्या प्रत्येक लिलेची कथेच्या रूपात मांडणी केली आहे.

चरित्र कथेच्या दुसऱ्या भागात महाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्तांना आलेले अनुभव व चमत्काराच्या कथा आहेत.महाराजांची परमपवित्र स्थाने, अधिकारी सद् भक्त, सतशिष्य, महाराजांचे अंशावतार इत्यादींची माहिती आहे.महाराजांच्या समकालीन गुरूबंधू व संतविभूती यांचा परिचय व कार्य.

या ग्रंथाचे संकलक व लेखक स्वामी भास्करानंद सरस्वती हे आहेत.

खरेदीसाठी संपर्क

श्रीकृष्ण सरस्वती चरित्र

या पुस्तकात महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्राची विविध कथांच्या रूपात मांडणी केली आहे.

लेखक : प्रा. माधव श्री. लाटकर

प्रकाशिका : गुरुसेविका सौ. मोहिनी महेश शिर्के

प्रकाशन : श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी – मठी (वैराग्य – मठी), कोल्हापूर.

प्रथम आवृत्ती : सन १९७६

तिसरी आवृत्ती : सन २०१८

खरेदीसाठी संपर्क

आरती संग्रह

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या समाधीस्थानी नित्यनैमित्तिक म्हटला जाणारा दैनदिन आरती संग्रह

डाऊनलोड करा