अध्याय ६ वा हिमाचल मधील एक तपस्वी संन्यासी श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्या दर्शनाला आले.

 

लेखक : श्री. बजरंग झेंडे

चरित्र : समुद्र भरला आहे

संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र.

(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)

(१) हिमाचल मधील एक तपस्वी संन्यासी श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्या दर्शनाला आले.

हिमाचलवासी एक तपस्वी संन्यासी कोल्हापूरचा लौकीक ऐकून जगदंबेच्या दर्शनाला आला. तरुण तेजस्वी ह्या विवक्त्याने मौनावस्थ धारण केली होती. गरज पडेल तेंव्हा तो पत्री मजकूर लिहून इतरांशी उत्तर देई. तो वैराग्य मठीत सकाळी सकाळीच महाराजांच्या दर्शनाला आला. नाही वंदन नाही स्तुती. अशा मौनावस्थेत तो महाराजांच्या कडे पहात होता. महाराज त्याच्याकडे पहात होते नेत्र पात कुणीही हालवत नाही. दोन्ही तेजस्वी मार्तंडाचे मौन संभाषण चाललेले इतर भक्त जनांनी नुसते पाहिले.

ओसरलीयां प्रथम प्रेमोमी

गीर्वाण भाषेत बोलती स्वामी

जनासी त्वमेवाहमस्मी I

पदांब्ज नमामि यति म्हणजे II५६II

त्रयमूर्तीचा अंश, अक्कलकोट नंतर इथे तू वास केला. तुझ्या अवतार परंपरेनेच ही धरा सुखी संपन्न होत आहे. मौन त्यागून त्या तपस्व्याने महाराजांची अशी स्तुती केली व निरोप घेत वैराग्य मठी बाहेर पडला. ह्या नंतर महाराज जवळ असलेल्या भक्त जनास म्हणाले, लाखो तपस्व्यात ऐसा तपस्वी कदापि पहावयास मिळणार नाही. तुम्ही त्यास बसवीला नाही, प्रसाद खडीसाखरेचा एक खडा ही त्याला दिला नाही. त्यावर भक्तजन म्हणाले “आम्ही त्यांना बोलावून आणतो. म्हणून दारा बाहेर जातो तर तो तपस्वी कांही क्षण झाले नव्हते पण तो गुप्त झाला होता. महालक्ष्मी मंदिर ते पंचगंगा तीर असे चहू बाजूला १५ भक्तजन फिरून आले पण तो साधक तपस्वी न दिसल्याचे वृत्त त्यांनी म्हाराजांना सांगितले”.महाराज हसून सर्वांना म्हणाले “बस्सा आता गप्प इथे !” दोन प्रहर पंधरा भक्त चहू बाजूला ज्याला शोधून थकले तो तपस्वी परत वैराग्य मठीत महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला. महाराजांचे चरण दर्शन घेतल्यावर “महाराज” आपण परत पाचारण केले म्हणून आलो, आपल्या प्रेमळ भक्तांना संतोष दिधला. आता येतो मी महाराजांचा निरोप घेता महाराजांच्या पुढयात वैराग्य मठातच तो तपस्वी गुप्त झाला ! महाबळेश्वराच्या समोरील एका उंच डोंगरावर किल्ला बांधून त्याला “प्रतापगड” हे नांव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. नंतर त्या नांवाला शोभेल व सार्थ होईल असा अदितीय प्रताप तेथे छत्रपतींनी केला. त्याचप्रमाणे श्री कृष्ण सरस्वती महाराजांनी तारामतींच्या ह्या वास्तुत राहण्यास आल्याबरोबर “वैराग्यमठी” म्हणून संबोधू लागले व मग विषय प्रेमीयांना विषयी विरक्ते विरक्ते विवेक योगीयांना सिध्दी प्रदान ह्या प्रमाणे तिला साजलेशा एकाहून एक दिव्य आणि अगम्य लीला महाराज करत राहिले.असेच आणखी एकदा परत एक हिमाचलवासी मदनापरी सतेज कांतीने भुषविलेला जटाधारी मौन वृत्तीत निमग्न असलेला विवेक योगी जगदंबा महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वैराग्यमठीत येऊन दाखल झाला ! नुसते महाराजांची नजरानजर होताच श्री गुरु सिंहासनापुढे जमिनीवर कोसळला. प्रहर दोन प्रहर झाले आता उठेल, नंतर उठेल श्री गुरूशी कांही तरी मनोगत बोलेल अशा विचारात महाराजांची सेवक मंडळी होती. पण तो कांही उठला नाही. जेंव्हा रात्र झाली तेंव्हा कोण्या एका सेवकाने महाराजांना विचारले, “महाराज ह्यांना भिंतीच्या कडेला नेऊन ठेऊ का ?” महाराज म्हणाले “नको ! ह्यांच्या अंगाला स्पर्श पण करू नका. तुमचे भाग्य थोर म्हणून हा तुम्हाला दिसला !” त्यावर तो सेवक म्हणाला “महाराज सुकृताचा ठेवा होता म्हणूनच तुम्ही सेवेत ह्या लीला आम्हांस दाखवित आहात. हा तपी – योगी पण तेहतीस कोटी देव तुमच्या दर्शनाची अपेक्षा धरतात !”

महाराज ह्यावर त्या दासाला म्हणाले असे विठूरायाच्यात आणि याच्यात काही भेद करू नका ! हा पुरुष नव्हे, हा पुरुषोत्तम आहे ! ह्याने थोडी मागील कांही इच्छा होती म्हणून याने देहाला कष्टविले. ह्याचा विषय कोणताच भ्रमिक विचार करू नका. ह्याप्रमाणे तिन दिवस रात्र उलटून गेल्यावर चौथ्या दिवशी मध्य रात्री महाराज त्यांच्या कानांत अस्पष्ट कांही तरी पुटपुटले ! गुरुंचा कान मंत्र म्हणजे शिष्याच्या जीवनाची सार्थकता ! महाराजांचे ते कदाचीत पराकोटीचे सिध्द अमृत संजीवनीचे बोल असावेत ! ते बोल कानी पडताच तो तापसी त्वरीतपणे उभा राहून श्री गुरुरायाना दृढलिंगन देत काही तरी सांकेतीक बोल बोलला. लगेच द्वारा बाहेर पडल्या क्षणीच अंतर्धान पावला. मती गुंग व्हावी अशा महाराजांच्या लीला दिवसें दिवस होत होत्या.

इकडे श्री गुरु सांगती I

आमुची तेथे नित्य वसती I

त्या भूवनासी वैराग्य मठी I 

म्हणती पोटी सुख तुम्हा II

(२) सहा वर्षाच्या रामनाथा कडून श्रीकृष्ण सरस्वतींनी नादिष्ठ भक्ताला उपदेश दिला.

तारामतीचा नातू अगदी अबोलका वयाने नुसता सहा महिन्याचा असताना त्याला महाराज घेऊन वडणगे गांवी “वेळाई” म्हणजे शिव भवानीच्या दर्शनाला निघाले होते.आद्दय गुरु श्री शंकराचार्यानी ह्या शिव प्रिय भवानी मातेस समयांबा म्हणून संस्कृत भाषेत गौरवलेले आहे. आपले श्री कृष्ण सरस्वती महाराज ह्याच शिवप्रियेला “वेळाई” म्हणून संबोधून मराठी भाषेत गौरविले आहे. जेंव्हा तुम्हाला संकट पडेल तेंव्हा ह्या भवानीला या. ही संकट पडेल तेंव्हा ही संकट वेळेला धावून येते. ही “वेळाई” आहे असे महाराज आपल्या भक्त जनास सांगत. जेंव्हा महाराज इकडे येत तेंव्हा अशा कांही कांही गोष्टी त्यावेळी बोलून जात.असेच एकदा ह्या वडणगे गांवास येताना त्या भक्त मंडळीत एक नादीष्ट भक्त होता. तारामतींच्या सहा महिन्याचा अबोलका नातू कोणी एक भक्त खांद्यावर घेऊन महारांच्या बरोबर चालत होता. दुपारच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एका भक्ताने महाराजांच्यावर छत्री धरली होती. ह्या मंडळीत जो नादिष्ट भक्त होता त्या भक्तास तो नाद सोडण्यासाठी महाराज सांगत असून सुध्दा तो भक्त सुधारत नव्हता. तो भक्त कोण हे इतर जवळच्या भक्तांना माहित पण नव्हते. हे षण्मासाचे बालक महाराजांनी खांद्यावर घेतल्यावर त्या नादिष्ट माणसाला उद्देशून म्हणाले “अरे ! महाराजांची अवज्ञा करू नको ! ते काय सांगतात ते ऐक नाहीतर तुझ्या वाटेला आयुष्यभर दारूण दु:ख आल्याशिवाय राहणार नाही”.ज्याला उद्देशून हे बालक बोलले तो भक्त चांगलाच मनोमनी वरमला असेल, परंतु, ह्या घटनेमुळे सर्व भक्तांना महाराजांच्या अगम्य लीला शक्तीचा अचंबा मात्र वाटला.

(३) वडणगे पुढील निगवे येथील विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण सरस्वती महाराज भक्ता समवेत गेले

“वेळाई” च्या दर्शनानंतर महाराजांच्यासह ही भक्त मंडळी विठोबाच्या दर्शनासाठी वडणग्यासाठी पुढे निगवे ह्या गांवी गेली. वडणगे पुढे निगवे ह्या गांवी गेली. विठ्ठल मंदिरात महाराज न जाता बाहेरील उजव्या बाजूच्या फरशीवर बसले.महाराजांच्या परवानगीने भक्त मंडळी आत विठोबाच्या दर्शनास ह्या तारामतीच्या अजाण बालकासह गेली. दर्शन घेऊन झाल्यावर कोण्या एका भक्तास दुर्मती झाली. त्याने कडेवर असणा-या ह्या बालकाचा उजवा हात धरून श्री विठ्ठलमूर्तीच्या कानशिलात लगावली. तेंव्हा बाकीचे तीन भक्त मजेखातर “खी ! खी ! करून हासले त्या बाल हाताची थप्पड मारून होताच त्या बालकाचे उजव्या हातातील सुवर्णाचे कडे एकाएकी नाहीसे झाले”. आता काय करावयाचे ? ते सर्व भक्त चिंता क्रांत अवस्थेतूनच “श्री गुरुंच्या चरणी लागले” ते भक्त महाराजांना ह्या घटने विषयी विचारणार तोच महाराज त्या सर्वांना उद्देशून म्हणाले “काय रे ! कसली अवदसा तुम्हाला आठवली ! तरीपण तुम्ही माझे भक्त म्हणून विठूरायानी तुम्हाला सौम्यच शिक्षा केली आहे बरं का !” नंतर ती पराक्रमी भक्त मंडळी महाराजांच्या वैराग्य मठीकडे परतत असतांनाच ह्या गंभीर घटनेच्या होणा-या परिणामाविषयी विचार करू लागली. आता तारामती आपल्याला चांगलेच फैलावर घेणार ! हे त्यांचे मनोगत विफलीत न होणारे असेच होते.तारामतीचा स्वभाव करारी होता. त्यांनी एका एका भक्तांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या तावडीतून कोणी सुटले नाही. शेवटी त्या सर्व अपराधी मंडळीनी समान वर्गणी काढून दुसरे सुवर्णाचे तेवढयाच मापाचे कडे तयार करून त्या बालकाचे हातात चढवले.

(४) रमाबाईंची समंध बाधा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी काढून टाकली.

रमाबाई ह्या एकवीस वर्षाची विधवा निपुत्रिक पण जवळ थोडी फार संपत्ती असलेली अबला होती. तिला एका समंधाने झपाटले होते. जोतिषी मंत्राचा त्यावर इलाज चालेना. समंधाचा जाच मात्र अधिकच वाढला. श्री कृष्ण सरस्वती महाराजांची तिने कीर्ती ऐकली होती. समंधबाधेतून मुक्तता होण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणून वैराग्य मठीत येऊन ती महाराजांच्या चरणी शरणागत झाली.आपलं गाऱ्हाणे तिने महाराजांना सांगता तिला महाराज म्हणाले या कार्यासाठी ५०० रुपये लागतील. हा सौदा व्यवहाराची मागणी थोडी विचित्र वाटणारी अशी आहे. त्रैयलोक्याच्या ह्या मोक्ष दायनी राजाला ५०० रुपये तरी कशाला पाहिजे होते ! असा प्रश्न कुणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे.पाचशे रुपयातले पाच पैसेही पण महाराजांना नको होते. रमाबाईंच्या कर्म दशेतनं तिच्याच खर्चाने तिला महाराज मुक्त करू पहात होते.

अतित अभ्यांगत भणंग दीन ! स्त्री पुरुष शुद्र ब्राम्हण I

तोषवावे कांही जन Iअन्नदान देऊनी ह्या हेतूने केलेली मागणी ऐकताच रमाबाई गप्पच बसली. एवढी रक्कम जाणार म्हणून तिने त्यातल्या त्यात हात आकसात घेण्याचे ठरवून आत जाऊन एकांतपणे तारामतींना आपले गाऱ्हाणे सांगत “ हे घ्या, आणि महाराजांच्याकडून माझी समंधबाधा नाहीशी करा” असे म्हणून त्यांच्या हातावर २५/- रुपये ठेवले.२५/- रुपयांच्या आमिषाने तारामतींनी रमाबाईची समंधबाधा घालवण्याची जोखीम स्वशिरावर घेतली “तुम्ही निर्धास्त राहा” असे रमाबाईंना त्यांनी वचन दिले. नंतर महाराजांच्या पुढे तारामतींनी तिला आणून “महाराज या अबलेची मुक्तता करा” असे म्हणून आग्रहाची विनवणी केली. महाराज त्यांना म्हणाले “आधी जामीनगत करा. आधी जामीनगत पटवली पाहिजे”. तारामती रमाबाईंच्यासाठी जामीनगत राहिल्या.लगेच महाराजांनी त्या समंधाला हजर केले. तो रमाबाईच्या शरीर संचारून महाराजांना म्हणाला “ देवा ह्या पापयोनित मला तुमचे दर्शन झाले या दुर्लभ दर्शनाला हीच पुण्यप्रद्बाई कारणी आहे.आता मात्र मी कधीच हिला त्रास देणार नाही. देवा जातो आता मी”.महाराजांचा निरोप घ्यावा तसा त्या समंधाने निरोप घेतला. संचार सोडून झाल्यावर ती रमाबाई सावध होऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाली. त्यांच्या संमतीने रमाबाईने महाराजांचा निरोप घेत घरी गेली. गेली ती गेलीच ! परत ती फिरली नाही.  इकडे महाराजांनी तारामतींच्याकडे “माझी जामीनगत आता पटवा” म्हणून तगादा लावला. पण तारामती तर तेंव्हा कांहीही करू शकत नव्हत्या ! ह्या नंतर कांही काळाने हिच रमाबाई अचानक वैराग्य मठीत महाराजांच्या चरणी परत नतमस्तक होऊन रडत रडत आपली करुण कहाणी सांगती झाली“. महाराज तुम्ही मागितले पाचशे रुपये ते मला देणे जड वाटू लागले म्हणून तुमचे चरण दर्शन पण घेणे टाळले. कालरात्री चार चोरानी मिळून माझे एक हजार रुपये पळवले !”

श्री गुरु म्हणती बरे झाले I प्राप्त तेची शोधीत आले I

गेले गेले सहस्त्र गेले I चित्रा वाटले बरे की ? II १०५ II

तारामतींना ही हकीकत समजताच त्या वाघिणी सारख्या चवताळून आल्या व रमाबाईला म्हणाल्या “नष्ट पापीणे I आतातरी कशाला आलीस ?” तेंव्हा रमाबाईने महाराजांच्या बरोबर त्यांची पण क्षमा मागत म्हणाली “ तारामती ! अगं तू पवित्र गुरु सेविका ! माझा एवढा अपराध तू पोटी घाल ! तुझ्या करुणेची मी याचिका करीत आहे.एवढी मला भीक घाल !”

आता हिला बोलून तरी काय उपयोग ? म्हणून तारामतीनी आपला क्रोध आवरला व मग हे प्रकरण शांत झाले.

 (५) भक्तांनी महाराजांना वैराग्य मठीतून हलविण्याचा विचार सोडला.हरिपंत व रामदास यांना ताराईचा श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्यावर असलेला अधिकार समजला.

महाराज तारामतींच्या गृही वावरत ! महाराज म्हणजे ह्या उकीरड्यात पडलेला एक हिराच आहे. या दत्त गुरूंना बाहेर कुठेतरी कायमचेच राहण्याचे ठिकाण आयोजीत केले पाहिजे. असा विचार कांही भक्त सेवकांच्या मनात आला व त्यांनी रुद्र पठणाचा बेत योजून तो परिपूर्ण पण केला ! नंतर चौदा दिवसांनी पुढे महाराज वेणी माधवांना म्हणाले “वेणी अरे तुमचा रुद्र कैलास नाथाला मान्य आहे. परी पंढरीचा नाथ एक आण्याच्या देण्यात कर्ज बाजारी झाला आहे.उपवास, व्रत, वैकल्य,अनुष्ठानाने कधी कर्जातून मुक्तता होत नाही”. त्यावेळी महाराजांच्या उक्तीतला अर्थ लवकर विशद झाला नाही. त्याच रात्री रामदास व हरिपंत हे दोघे निद्रिस्त असता एकच स्वप्न एकाच वेळी दोघांना पडले.

वैराग्य मठीमध्ये जिथे आज भजनाच्या वेळी मृदंग वाजवला जातो त्या लाकडी खांबाला बलाढ्य हनुमंत मारुती रायाला ताराबाईंनी एका जाड जुड दोर खंडाने कर कचुनी बांधले असून, त्या उभय सेवक रामदास व हरिपंताना म्हणत आहेत.

“तीन जन्माचे माझे अगाध असे तप म्हणून हा मी मारुती राजाला असा इथे बांधून ठेवले आहे ! नाही तर तो काय ?” दोघेजण जागृत होऊन एकमेकांना पडलेले एकच स्वप्न सांगत होते. जवळच वेणी माधव होते. एकच स्वप्न ह्या उभयदासांना पडलेले पाहून विलक्षण आश्चर्य वाटले. गुरूची अगाध सत्ता विशद करते वेळी माधव स्वत:ला गुरुंनी सांगितलेली.

“पंढरीची विठ्ठल भगवान I एक आणा त्यास झाले ऋण

अर्धे त्यातील गेले फिटून I अर्धे अजून बाकी असे

उभयतास सांगे येऊ I आजची बोलले श्री गुरु कर्ज बाजारी रमावरू I मुक्त न करू शकते व्रते”

आता तुम्ही श्री गुरूंना ह्या वास्तूतून बाहेर काढण्याचा विचार सोडा. महाराज कांही झाले तरी वैराग्य मठी सोडणार नाहीत ! तारामतींच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठी ते इथे राहिले आहेत ! ह्या स्थानाचा स्वीकार अथवा त्याग त्यांच्या इच्छेनुसारच होणार ! त्यात आपल्याला कांहीही ढवळा ढवळ करता येणार नाही. वेणी माधवाचा हा विचार रामदास व हरिपंत उभयतांना मान्य झाला.